प्रा. सुरेशभाऊ देशमुख
सुरेश भाऊ देश मुख यांना सेवाग्राम येथील मारोतराव देश मुख यांचा समाजसेवी वारसा लाभला. मारोतराव देशमुख हे भाऊंचे आजोबा, महात्मा गांधीजींच्या विचारांने अणि कार्याने ते प्रभावित झाले. मारोतरावांनी आपला मुलगा बापूराव यांना समाजसेवी कार्यासाठी महात्मा गांधीकडे सूपूर्द केले. हेच बापूराव पुढे शिक्षणमहर्शी आणि सहकार महर्शी बापूरावजी देशमुख झाले.
Our fingerprints on the lives we touch never fade
लोकनेते माजी आमदार प्रा. सुरेश भाऊ देशमुख
भाऊंनी पहिली विधानसभा निवडणूक 1985 साली हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातून लढविली आणि त्यांच्या राजकीय जीवनाला सुरूवात झाली. त्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नसले तरी लोकमानसावर आपला प्रभाव उमटविण्यात ते यशस्वी ठरले. 1990 पासून ते यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थाचे संचालक म्हणून कार्यरत होते. दाआजीच्या निधनानंतर 1990 ते 2020 पर्यंत तीन दश के त्यांनी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून विदर्भातील या मोठ्या शिक्षणसंस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. या संस्थेला शिक्षणाचे केंद्र बनवून ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
वर्धा जिल्ह्याच्या सहकारक्षेत्रात भाऊंचे कार्य उल्लेखनीय असेच आहे.. 1985 साली ते वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक झाले. 1985 सालीच वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. 1992 पासून ते विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. 1999 पासून सेवाग्रमाच्या बापूरावजी देशमुख सूतगीरणीचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. 2000 ते 2016 या काळात ते वेळ्याच्या साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिले. 2002 ते 2014 पर्यंत वर्धा जिल्हा को-ऑपरेटिव्ह बॅंक मयादित चे अध्यक्षपद सांभाळले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे महाराष्ट्रातील अनेक संस्थांमध्ये त्यांनी कार्य केले. त्यात विश्वस्त, वसंतदादा शूगर इन्स्टिटयूट, पुणे / – संचालक, महात्मा गांधी इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा संचालक, तुळजाई शिक्षण सस्था, वर्धा- संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, मुंबई, संचालक, बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम – बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम / – / / – उपाध्यक्ष, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ /
वर्ध्याचे सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरण सुदृढ करण्यात भाऊंचा मोठा वाटा राहिला. अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी आपली सामाजिक जाणीव जपली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या, साठाव्या हिरक महोत्सवी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांची साहित्याविशयीची प्रगाढ आस्था दिसून आली आहे. वर्धा येथे आंबेडकरी साहित्य अकादमीच्या विचारवेध साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे नेतृत्त्व करताना त्यांचे वैचारिक नेतृत्वकौशल्य दिसून आले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक म्हणजे महाराष्ट्र राज्याची शिखर बॅंक, या शिखर बॅंकेच्या संचालक पदावर असताना त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. त्याची परिणती म्हणजे याच षिखर बॅंकेचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या बॅंकेचे अध्यक्ष होणे ही मोठी सन्मानाची आणि प्रतिष्ठेची गोष्ट. शिखर बॅंकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 2001 ते 2003 अशी दोन वर्षे कार्य केले. या बॅंकेचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना दोन वेळा मिळाला. या काळात भाऊंनी महाराष्ट्रातील विविध बॅंकांना सढळ हाताने मदत केली. महाराष्ट्र राज्याच्या शिखर बॅंकेचे अध्यक्ष असताना जिनेव्हा येथे ते प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून गेले होते. सूतगिरणीचे अध्यक्ष असताना स्पिनिंगच्या परिषदेसाठी ते जपानच्या दौ-यावर गेले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्या संस्थापक आणि पक्षीय कार्यासाठी दुबई, इटली, सिंगापूर, मलेशिया इत्यादी देशाचे दौरे केले. युरोपच्या अभ्यास दौ-यावर ते दोनदा गेले. परदेश दौ-यातून त्यांना जे अनुभव आले त्याचा त्यांनी आपल्या प्रशासनासाठी उपयोग करून घेतला.
2009 साली भाऊंनी वर्धा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. सुरेश भाऊंसाठी ही निवडणूक अत्यत महत्त्वाची ठरली. या मतदार संघातील सर्वच मतदारांनी ती अत्यंत प्रतिष्ठेची केली. या विधानसभा क्षेत्रातील सर्वच लोक मोठ्या ताकदीने कामाला लागले. मोठे व्यक्ती, महिला आणि लहान मुले प्रचारकार्यासाठी उतरले. लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि भाऊ या निवडणुकीत प्रचंड मताने निवडून आले. भाऊ आमदार झाले याचा सर्वांना अत्यंत आनंद झाला. सर्वांनी हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला. या विजयाचा आंनंद सर्वांच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता. 2009 ते 2014 अषी पाच वर्षे भाऊंनी आमदार म्हणून लोकाभिमुख कार्य केले. मतदार संघातील लोकांसाठी सतत कार्यरत राहिले. लोकांच्या समस्या जाणून घेणे त्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल याचा विचार करणे, त्यासाठी कार्यकत्यांची आणि पदाधिका-यांची मते जाणून घेणे आणि लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे असे स्वरूप त्यांच्या एकूणच कामाचे होते. या काळात त्यांनी जास्तीत जास्त वेळ लोकांच्या सेवेसाठी दिला. त्या काळात मतदार संघात उद्भवलेली पूरस्थिती, दुश्काळ, शेतक-यांचे झालेले अतोनात नुकसान, मजुरीच्या समस्या, यांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सर्वांना मदतीचा हात दिला. या काळात त्यांनी लोकाभिमुख कामांचा वेग वाढवला. अनेक कामांचे भूमिपूजन केले आणि त्यां कामांना पूर्णत्वास नेले. भाऊंची आमदारकीची कारकीर्द मतदार संघात ऐतिहासिक स्वरुपाची ठरली.
त्यांचे सर्वच पक्षांच्या नेत्यांसोबत आधीपासूनच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वर्ध्याच्या भूमीत कोणत्याही नेत्याने पाय ठेवले तर सुरेश भाऊंच्या भेटीला जाणार नाहीत असे घडत नाही. या सर्व कामाचा व्याप सांभाळत असताना एक आदर्श कुटुंबप्रमुख म्हणून भाऊंनी नेहमीच जबाबदारी सांभाळली. भाऊ शरदराव देशमुख यांच्या जडणघडणीत सुरेश भाऊंचा मोठा वाटा आहे. मुलगा समीर अभियांत्रिकीची पदवी घेऊन त्याने राजकीय व सामाजिक जीवनात प्रवेश केला आहे. दुसरा मुलगा संदीप हा एक उत्कृष्ठ प्रशासक म्हणून कार्य करीत आहे.
आज भाऊंनी 75 वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या एकूणच आयुष्याचा आलेख उंचावत राहिला आहे. विदर्भाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे ठरले आहे. सध्या ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आपली भूमिका बजावत आहेत. या मातीशी या भूमीशी त्यांची जुळलेली नाळ कधीही तुटणारी नाही. वर्धा जिल्हा आणि विदर्भात सुरेशभाऊ देशमुख हे नाव एक सर्वसमावेशक लोकनेता, अजातशत्रू राजकारणी म्हणून कायमच स्मरणात राहणार आहे. भाऊंच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांना निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशा आपणा सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक सदिच्छा ।
लोकनेते माजी आमदार प्रा. सुरेश भाऊ देशमुख
20 मे 1949 – जन्म, सेवाग्राम
1959 – प्राथमिक शिक्षण नगर परिषद प्राथमिक शाळा, वर्धा
1965 – माध्यमिक व मॅट्रिकचे शिक्षण, महात्मा गांधी ( क्रॅडक) हायस्कूल, वर्धा
1969 – महाविद्यालयीन शिक्षण, एम. ए. राज्यशास्त्र, यशवंत महाविद्यालय, वर्धा
सन 1969 पासून – विद्यार्थी चळवळींशी संबंध
1971-1972 पासून – विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग
1975 – युवक कॉंग्रसामध्ये प्रवेश
20 डिसेंबर 1978 – स्वातीताई देशमुख यांच्याशी विवाह
1973 ते 1989 – राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे अध्यापनाचे कार्य
1975 – वर्धा जिल्हा, युवक कॉग्रेस जनरल सेक्रकटरी
1978 – मा. शरदचंद्रजी पवार यांची भेट
1976 – सरचिटणीस, राष्ट्रीय युवक काँग्रेस, वर्धा जिल्हा
1985 – संचालक, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
1985 – अध्यक्ष, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
– पहिली राजकीय निवडणूक ( हिंगणघाट चिधानसभा क्षेत्र )
1090- संचालक, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा
1990 ते 2020 – अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा
1919 पासून आतापर्यंत – संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, मुंबई
1992 पासून – विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन,
2009 – विजयी निवडणूक
1992- बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम
1992- संचालक, बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम
1999 पासून – अध्यक्ष, बापूरावजी देशमुख सूतगीरणी, सेवाग्राम…….
2000 ते 2016 – अध्यक्ष, साखर कारखाना, वेळा, ……….
2002 ते 2014 – उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश
– अध्यक्ष, वर्धा जिल्हा को-ऑपरेटिव्ह बॅंक मयादित
2009 ते 2014- उपाध्यक्ष, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
– कार्याध्यक्ष, अ. भा. आंबेडकरवादी साहित्य समंलन, वर्धा
2012- स्वागताध्यक्ष, विदर्भ साहित्य संमेलन, वर्धा
– स्वागताध्यक्ष, विचारवेध साहित्य संमेलन, वर्धा
1992- संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक, (शिखर बॅंक ), मुंबई
– 2001 ते 2002 – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक, (शिखर बॅंक), मुंबई
व 2002 ते 2003 ( दोन टर्म )
– संचालक, तुळजाई शिक्षण सस्था, वर्धा
2020 पासून – स्वीकृत सदस्य, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा
– विश्वस्त, वसंतदादा शूगर इन्स्टिटयूट, पुणे
1995- संचालक, महात्मा गांधी इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा
2009 ते 2014 – आमदार, वर्धा विधानसभा
1992-1993 – जपान, सूतगिरणी
2001-2002 – युरोप दौरा, बॅंकेचे अध्यक्ष असताना महाराष्ट्र बॅंकेचे
About Sureshbhau Deshmukh
परिचय
लोकाभिमुख राजकारणाचे आदर्श रूप, विदर्भाच्या राजकारणात समाजकारणाची खोल बिजे रूजविणारे सच्चे व प्रामाणिक राजकारणी, सर्वसमावेशक राजकारणातून लोककल्याणाचा ध्यास घेतलेले लोकसेवक, संयम आणि पारदर्शी व्यक्तिमत्त्वाचे धनी, लोकसंपर्कातून माणसे जोडत जाणारे उत्तम संघटक, सर्वासोबत जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे अजातशत्रू, शिक्षण, साहित्य, संस्कृती, समाज, सहकार आणि राजकारण यांचा अपूर्व मेळ जुळवून आणणारे विदर्भातील सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व, म्हणजे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा वर्धा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. सुरेशभाऊ देशमुख. प्रा. सुरेश भाऊ देशमुख हे वर्धा जिल्ह्याचे सार्वजनिक क्षेत्रातील एक भूषण म्हणूनच नाही तर विदर्भरत्न म्हणूनही आपणां सर्वांना ज्ञात आहेत.
सुरेश भाऊ देश मुख यांना सेवाग्राम येथील मारोतराव देश मुख यांचा समाजसेवी वारसा लाभला. मारोतराव देशमुख हे भाऊंचे आजोबा, महात्मा गांधीजींच्या विचारांने अणि कार्याने ते प्रभावित झाले. मारोतरावांनी आपला मुलगा बापूराव यांना समाजसेवी कार्यासाठी महात्मा गांधीकडे सूपूर्द केले. हेच बापूराव पुढे शिक्षणमहर्शी आणि सहकार महर्शी बापूरावजी देशमुख झाले.
सुरेश भाऊंचा जन्म 20 मे 1949 रोजी सेवाग्राम येथे झाला. वडील बापूरावजींच्या करारी स्वभावाच्या शिस्तीत आणि आई रमाबाई यांच्या प्रेमळ व धार्मिक संस्कारात ते वाढत गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगर परिषद प्राथमिक शाळा, वर्धा येथे झाले. माध्यमिक शिक्षण क्राडक हायस्कूल म्हणजेच आजची महात्मा गांधी हायस्कूल येथे पूर्ण केले.
त्यानंतर पदवी शिक्षण त्यांनी याच यशवंत महाविद्यालयात घेतले. भाऊंना राज्यशास्त्र विषयाची आवड असल्यामुळे त्यांनी राज्यशास्त्र विषयात एम. ए. ची पदवी पूर्ण केली. सन 1969 सालापासून म्हणजे वयाच्या 20 वर्षा पासूनच ते विद्यार्थी चळवळींशी जोडले गेले. 1971 ते 1972 या दोन वर्षात त्यांनी अनेक विद्यार्थी चळवळींमध्ये सहभाग घेतला. युवक कॉंग्रेसमध्ये कार्य करीत असताना 1973 साली भाऊंची ओळख महाराष्ट्रातील युवकांचे कुशल नेतृत्व करणा-या माननीय शरद पवार यांच्यासोबत झाली. शरद पवार यांच्या पहिल्या भेटीने त्यांच्या मनात राजकीय कार्याबद्दल मोठ्या प्रमाणात आस्था निर्माण झाली. त्यांचा राजकीय आलेख वाढत गेला. 1975 साली त्यांनी युवक कॉंग्रसमध्ये रितसर प्रवेश घेतला. त्यांनी विविध राजकीय पदे भूषविली. सरचिटणीस, राष्ट्रीय युवक काँग्रेस, वर्धा जिल्हा, युवक कॉग्रेस जनरल सेक्रटरी राष्ट्रवादी कॉंग्रस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश
सुरेश राव राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य करीत होते. याच काळात राजकारणातही सहभागी होऊ लागले होते. दाआजीच्या मनात त्यांच्या विवाहाचा विचार आला. त्या दृष्टीने त्यांनी वधूशोध सुरू केला. निरपूर, ता. खामगाव जिल्हा बुलढाणा येथील आनंदराव देश मुख आणि शशीकला देशमुख हे अत्यंत सुसस्कृत कुटुंब. उत्तम शेती करणारे आणि विविध सामाजिक कार्यात सहभागी असलेले आनंदरावांचे कुटुंब. त्यांची स्वाती ही सालस, सुस्वभावी आणि कौटुंबिक नाते जोपासणारी मुलगी दाआजींनी सून म्हणून पसंत केली. त्यावेळी स्वातीताई 23 वर्षाच्या होत्या. 20 डिसेंबर 1978 रोजी वयाच्या 29 व्या वर्षी सुरेश भाऊंचा विवाह स्वातीताई यांच्याशी झाला.
चरित्र
भाऊंनी पहिली विधानसभा निवडणूक 1985 साली हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातून लढविली आणि त्यांच्या राजकीय जीवनाला सुरूवात झाली. त्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नसले तरी लोकमानसावर आपला प्रभाव उमटविण्यात ते यशस्वी ठरले. 1990 पासून ते यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थाचे संचालक म्हणून कार्यरत होते. दाआजीच्या निधनानंतर 1990 ते 2020 पर्यंत तीन दश के त्यांनी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून विदर्भातील या मोठ्या शिक्षणसंस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. या संस्थेला शिक्षणाचे केंद्र बनवून ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
वर्धा जिल्ह्याच्या सहकारक्षेत्रात भाऊंचे कार्य उल्लेखनीय असेच आहे.. 1985 साली ते वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक झाले. 1985 सालीच वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. 1992 पासून ते विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. 1999 पासून सेवाग्रमाच्या बापूरावजी देशमुख सूतगीरणीचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. 2000 ते 2016 या काळात ते वेळ्याच्या साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिले. 2002 ते 2014 पर्यंत वर्धा जिल्हा को-ऑपरेटिव्ह बॅंक मयादित चे अध्यक्षपद सांभाळले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे महाराष्ट्रातील अनेक संस्थांमध्ये त्यांनी कार्य केले. त्यात विश्वस्त, वसंतदादा शूगर इन्स्टिटयूट, पुणे / – संचालक, महात्मा गांधी इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा संचालक, तुळजाई शिक्षण सस्था, वर्धा- संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, मुंबई, संचालक, बापूरावजी देश मुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम – बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम / – / / – उपाध्यक्ष, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ /
वर्ध्याचे सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरण सुदृढ करण्यात भाऊंचा मोठा वाटा राहिला. अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी आपली सामाजिक जाणीव जपली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या, साठाव्या हिरक महोत्सवी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांची साहित्याविशयीची प्रगाढ आस्था दिसून आली आहे. वर्धा येथे आंबेडकरी साहित्य अकादमीच्या विचारवेध साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे नेतृत्त्व करताना त्यांचे वैचारिक नेतृत्वकौशल्य दिसून आले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक म्हणजे महाराष्ट्र राज्याची शिखर बॅंक, या शिखर बॅंकेच्या संचालक पदावर असताना त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. त्याची परिणती म्हणजे याच षिखर बॅंकेचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या बॅंकेचे अध्यक्ष होणे ही मोठी सन्मानाची आणि प्रतिष्ठेची गोष्ट. शिखर बॅंकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 2001 ते 2003 अशी दोन वर्षे कार्य केले. या बॅंकेचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना दोन वेळा मिळाला. या काळात भाऊंनी महाराष्ट्रातील विविध बॅंकांना सढळ हाताने मदत केली. महाराष्ट्र राज्याच्या शिखर बॅंकेचे अध्यक्ष असताना जिनेव्हा येथे ते प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून गेले होते. सूतगिरणीचे अध्यक्ष असताना स्पिनिंगच्या परिषदेसाठी ते जपानच्या दौ-यावर गेले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्या संस्थापक आणि पक्षीय कार्यासाठी दुबई, इटली, सिंगापूर, मलेशिया इत्यादी देशाचे दौरे केले. युरोपच्या अभ्यास दौ-यावर ते दोनदा गेले. परदेश दौ-यातून त्यांना जे अनुभव आले त्याचा त्यांनी आपल्या प्रशासनासाठी उपयोग करून घेतला.
जीवनपट
20 मे 1949 – जन्म, सेवाग्राम
1959 – प्राथमिक शिक्षण नगर परिषद प्राथमिक शाळा, वर्धा
1965 – माध्यमिक व मॅट्रिकचे शिक्षण, महात्मा गांधी ( क्रॅडक) हायस्कूल, वर्धा
1969 – महाविद्यालयीन शिक्षण, एम. ए. राज्यशास्त्र, यशवंत महाविद्यालय, वर्धा
सन 1969 पासून – विद्यार्थी चळवळींशी संबंध
1971-1972 पासून – विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग
1975 – युवक कॉंग्रसामध्ये प्रवेश
20 डिसेंबर 1978 – स्वातीताई देशमुख यांच्याशी विवाह
1973 ते 1989 – राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे अध्यापनाचे कार्य
1975 – वर्धा जिल्हा, युवक कॉग्रेस जनरल सेक्रकटरी
1978 – मा. शरदचंद्रजी पवार यांची भेट
1976 – सरचिटणीस, राष्ट्रीय युवक काँग्रेस, वर्धा जिल्हा
1985 – संचालक, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
1985 – अध्यक्ष, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
– पहिली राजकीय निवडणूक ( हिंगणघाट चिधानसभा क्षेत्र )
1090- संचालक, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा
1990 ते 2020 – अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा
1919 पासून आतापर्यंत – संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, मुंबई
1992 पासून – विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन,
2009 – विजयी निवडणूक
1992- बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम
1992- संचालक, बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम
1999 पासून – अध्यक्ष, बापूरावजी देशमुख सूतगीरणी, सेवाग्राम…….
2000 ते 2016 – अध्यक्ष, साखर कारखाना, वेळा, ……….
2002 ते 2014 – उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश
– अध्यक्ष, वर्धा जिल्हा को-ऑपरेटिव्ह बॅंक मयादित
2009 ते 2014- उपाध्यक्ष, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
– कार्याध्यक्ष, अ. भा. आंबेडकरवादी साहित्य समंलन, वर्धा
2012- स्वागताध्यक्ष, विदर्भ साहित्य संमेलन, वर्धा
– स्वागताध्यक्ष, विचारवेध साहित्य संमेलन, वर्धा
1992- संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक, (शिखर बॅंक ), मुंबई
– 2001 ते 2002 – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक, (शिखर बॅंक), मुंबई
व 2002 ते 2003 ( दोन टर्म )
– संचालक, तुळजाई शिक्षण सस्था, वर्धा
2020 पासून – स्वीकृत सदस्य, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा
– विश्वस्त, वसंतदादा शूगर इन्स्टिटयूट, पुणे
1995- संचालक, महात्मा गांधी इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा
2009 ते 2014 – आमदार, वर्धा विधानसभा
1992-1993 – जपान, सूतगिरणी
2001-2002 – युरोप दौरा, बॅंकेचे अध्यक्ष असताना महाराष्ट्र बॅंकेचे
Achievements
Suspendisse finibus urna mauris, vitae consequat quam blandit vel. Vestibulum leo ligula, molestie ullamcorper vulputate vitae sodales commodo nisl. Nulla facilisi. Pellentesque est metus. There are many variations of eration in some form.